छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नवीन योजनेचे पाणी शहरातील नागरिकांना देण्यासाठी अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. काही जलवाहिनीवर कनेक्शनही दिले आहेत. मात्र, आता हायड्रॉलिक झाल्याशिवाय जलवाहिनीवर नळ कनेक्शन दिले जाणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलवाहिनीनिहाय नियोजन मागविले आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर चाचणी घेवून, काम पूर्ण झाल्याचे सांगितल्यानंतरच आम्ही कनेक्शन देणे सुरू करू, असे मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि.३१) पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीमार्फत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्यानंतर त्यांनी हायड्रोलिक चाचणी घेतली
दररोज १०० एमएलडी पाणी
दररोज २०० एमएलडी उचल नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला आता १०० एमएलडी पाणी दररोज येत आहे. हे पाणी वाढल्याने, जुन्या योजनांचे पाणी उपसा कमी करून १०० ते ११० एमएलडी केला आहे. शहरात जुन्या आणि नवीन योजनांचे एकूण २०० ते २१० एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. यातील १० एमएलडी पाणी नवीन जलवाहिन्यांची स्वच्छता आणि हायड्रॉलिक चाचणीसाठी वापरले जात आहे. नवीन योजनेअंतर्गत १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहरातील जलकुंभांपर्यंत पाणी आणण्यात आले आहे. ११०० मिमी. व्यासाच्या जलवाहिनीसुद्धा कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे.
पाहिजे होती. शहरात एकूण १९०० किमीची जलवाहिन्या टाकायच्या आहेत. त्यापैकी १२०० किमी. पर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. यातील केवळ २०० किमी जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी झालेली आहे, तर १ हजार किमी. ची हायड्रोलिक चाचणी घेणे बाकी आहे. दररोज
१०० ते १५० मिटर जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी होत असून, हा वेग कमी आहे. चाचणी नसल्याने नळ कनेक्शन देण्यासाठी उशिर होत आहे. त्यामुळे लवकरच एमजेपी, सदस्य सचिव आणि विभागीय आयुक्त यांच्या समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












